Pages

Sunday, September 16, 2012

हुतात्‍म्‍यांना अभिवादन

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त थोर हुतात्‍म्‍यांना नळदुर्ग गड व तुळजापूर लाईव्हच्यावतीने विनम्र अभिवादन! संपादकीय विशेष वाचण्‍यासाठी लॉग ऑन करा www.tuljapurlive.com

Tuesday, September 11, 2012

नळदुर्ग भुईकोट किल्‍ल्‍याची पर्यावरण व सांस्कृतिक मंञ्याकडून पाहणी


नळदुर्ग – मराठवाडयातील नळदुर्ग येथील इतिहासाची साक्ष देत दिमाखात उभा असलेल्‍या भुईकोट किल्‍ल्‍याची खासगी सामाजिक संस्‍थामार्फत सुधारणा करुन देशातील एक उत्‍कृष्‍ट पर्यटन केंद्र निर्माण करण्‍यासाठी गड किल्‍ल्‍याचे संरक्षण व पर्यटकांना आकर्षित करण्‍यासाठी शासनाने हा किल्‍ला पर्यटकांसाठी खासगी सामाजिक संस्‍थाकडे बांधा वापरा हस्‍तांतरण करा, या तत्‍त्‍वाने भाडयाने देवून किल्‍ल्‍याची जपवणूक करण्‍याबाबत मंगळवार दि. 11 सप्‍टेंबर रोजी पर्यावरण व सांस्‍कृतिक खात्‍याचे कॅबीनेट मंञी ना. संजय देवताळे, पालकमंञी ना. मधुकरराव चव्‍हाण यांच्‍यासह पुरातत्‍व खात्‍याच्‍या अधिका-यांनी किल्‍ल्‍यास भेट देवून पाहणी केली.
  पर्यावरण व सांस्‍कृतिक मंञी ना. संजय देवताळे, पालकमंञी ना. मधुकरराव चव्‍हाण, खा. पद्मसिंह पाटील, पुरातत्‍व खात्‍याचे संचालक संजय पाटील, सहायक संचालक राहुल भोसले, अवल सचिव ना.सी. भोगे, जिल्‍हा कॉंग्रेस अध्‍यक्ष आप्‍पासाहेब पाटील, राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्‍हा कार्याध्‍यक्ष सुरेश देशमुख, तहसिलदार व्‍ही.एल. कोळी, पुरातत्‍व खात्‍याचे माजी संचालक जामखेडकर, गोपाळ गोदे, मजूर संघाचे अध्‍यक्ष नारायण ननवरे, युनिटी मल्‍टीकॉनचे संचालक कफील मौलवी, अनिल पाटील, नगराध्‍यक्ष नितीन कासार, मुख्‍याधिकारी राजेश जाधव, माजी उपनगराध्‍यक्ष नयर जहागिरदार, पं.स. उपसभापती प्रकाश चव्‍हाण यांच्‍यासह अधिकारी, प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

  यावेळी प्रे‍क्षणीय नरमादी (सध्‍या बंद) धबधबा, पाणी महाल, रंगमहाल, उपली बुरूज, नव बुरूज, परंडा बुरूज, बारादरी आदीसह इतर परिसराची प्रमुख मान्‍यवरांनी पाहणी केली. या कार्यक्रमाचे सुञसंचालन उपनगराध्‍यक्ष शहबाज काझी यांनी केले तर आभार कॉंग्रेस सेवा दलाचे शहराध्‍यक्ष विनायक अहंकारी यांनी मानले.

Sunday, September 9, 2012

नळदुर्गात भव्‍य युवक कॉंग्रेसचा मेळावा


कॉंग्रेस पक्षाचे भव्‍य युवक मेळाव्‍यात नळदुर्ग शहर युवक कॉंग्रसेच्‍या अध्‍यक्षपदी बसवराज धरणे याची निवड करुन निवडीचे पञ देताना पालकमंञी ना. मधुकरराव चव्‍हाण, कॉंगेस प्रदेशचे सरचिटणीस आ. बसवराज पाटील, जिल्‍हाध्‍यक्ष आप्‍पासाहेब पाटील, युवक जिल्‍हाध्‍यक्ष अमर खानापूरे, नगराध्‍यक्ष नितीन कासार, उपनगराध्‍यक्ष शहबाज काझी सत्‍कार करून जल्‍लोष करताना दिसत आहेत.

Friday, September 7, 2012

शिक्षकदिनाची ऐशी की तैशी


बुधवार दि. 5 सप्‍टेंबर रोजी देशभर शिक्षकदिन मोठया उत्‍साहात साजरा होत असताना लोहारा (जि. उस्‍मानाबाद) तालुक्‍यातील एका गावात असलेल्‍या जिल्‍हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत असणारे शिक्षक महाशय नळदुर्ग (ता. तुळजापूर) येथील राज्‍य परिवहन महामंडळाच्‍या बसस्‍थानकामध्‍ये प्रवाशी निवा-यात भरपूर दारू ढोसून चक्‍क लोळत असल्‍याचे उघडकीस आले. त्‍याचे वरील हे बोलके छायाचिञ श्री. व्‍यंकटेश्‍वर यांनी टिपले. दरम्‍यान शाळा, महाविदयालयाचे विदयार्थी, शिक्षक व प्रवाशी आश्‍चर्याने हा प्रकार पाहून थक्‍क होताना दिसत होते.

Sunday, September 2, 2012

महामार्गावरील वाहनचालक व प्रवाशांना दिलासा - ना. चव्‍़हाण

 

        जगद्‍गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्‍थान श्री क्षेञ नाणीज धाम, ता.जि. रत्‍नागिरी यांच्‍यावतीने महाराष्‍ट्र राज्‍यातील प्रमुख महामार्गावर अपघातग्रस्‍ताकरिता विनामुल्‍य मोफत रुग्‍णवाहिका सुरु करुन अनेकांचे प्राण वाचविण्‍यासाठी संस्‍थानचे हे सामाजिक कार्य कौतुकास्‍पद असून शासन या संस्‍थानास सर्वोत्‍तोपरी सहकार्य करेल, अशी ग्‍वाही राज्‍याचे पशुसंवर्धन, दुग्‍धविकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय मंञी तथा उस्‍मानाबाद जिल्‍हयाचे पालकमंञी ना. मधुकरराव चव्‍हाण्‍ा यांनी रविवार दि. 2 सप्‍टेंबर रोजी नळदुर्ग येथे रुग्‍णवाहिका लोकार्पण सोहळयाप्रसंगी दिली.
          राष्‍ट्रीय महामार्गावरील अपघातग्रस्‍तांसाठी 24 तास विनामूल्‍य मोफत सेवेच्‍या रुग्‍णवाहिकेचे लोकार्पण सोहळा मोठया थाटाने संपन्‍न झाला. याप्रसंगी व्‍यासपीठावर तुळजापूरचे तहसिलदार व्‍यंकटराव कोळी, नायब तहसिलदार राजेश जाधव, नगराध्‍यक्ष नितीन कासार, संस्‍थानचे राजन बोडेकर, संप्रदाय उस्‍मानाबाद जिल्‍हा सेवा समितीचे अध्‍यक्ष विजय भाते यांच्‍यासह भरगच्‍च प्रमुख अतिथी उपस्थित होते. तरी महाराष्‍ट्रातील राज्‍यातील पुढील प्रमुख महामार्गावरील 28 गावामध्‍ये 28 रुग्‍णवाहिका 24 तास तत्‍पर ठेवण्‍यात आले आहे. नागरिकांनी पुढील मोबाईलवर संपर्क साधण्‍याचे आवाहन संस्‍थानच्‍यावतीने करण्‍यात आले आहे.                  महामार्गावरील रुग्‍णवाहिका असलेली गावे व चालकांचे मोबाईल नंबर
         महामार्ग क्रमांक 3 मुंबई-आग्रा महामार्गावरील शहापूर - 8380011067,झोडगे - 8380011070 इगतपुरी (गोंदेफाटा) - 8380011068,सोनगीर (देवबाने) - 8380011071, पिंपळगाव (ओझर) - 8380011069, शिरपूर(सावळदा) - 8380011072, महामार्ग क्रमांक 8 मुंबई-अहमदाबाद मार्गावरील सिरसाट नाका - 9689733899,मनोर नाका - 9689833899, तलासरी नाका - 8975633899, महामार्ग क्रमांक 9 मुंबई-हैदराबाद मार्गावरील ताथवडे - 8380011074,शेटफळ - 8380011078, यवत - 8380011075,नळदुर्ग - 8380011079, भिगवन - 8380011076, उमरगा - 8380011080, इंदापूर - 8380011077, महामार्ग क्रमांक 17 मुंबई-गोवा मार्गावरील पनवेल - 9527544899, हातखंबा - 9552444899, नागोठणे - 9552549691, नाणीज - 9552549695,माणगाव - 9552580799, राजापूर - 9552549693,काशेडी घाट - 9552549692,कणकवली - 9552549694, चिपळूण - 9552644899,सावंतवाडी - 75012121, संगमेश्‍वर - 8380011073

Saturday, September 1, 2012

दिशा दर्शक फलक कोरा उभा असल्याने वाहनचालकांची गोची

कर्नाटकसह आंध्रप्रदेशातील भाविकांना श्री क्षेञ तुळजापूरला देवीच्याच दर्शनासाठी नळदुर्ग मार्गे जाण्या, येण्याचा सोयीचा एकमेव मार्ग आहे. माञ राष्ट्रीय महामार्गापासून तुळजापूरकडे जाणा-या फाटयावर दिशा दर्शक फलक गेल्याय अनेक वर्षापासून कशाचाही उल्लेख नसलेला उभा असल्याने भाविक प्रवाशी, वाहनचालकांची फसवणूक होत असून संबंधित खात्याच्या गलथान कारभाराबदृल वाहनचालक व भाविक प्रवाशांतून संताप व्यक्त केला जात आहे. नळदुर्ग हे सोलापूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर वसलेले शहर आहे. या ठिकाणाहून आंध्रप्रदेश व कर्नाटक राज्याच्या सीमा जवळच आहेत. त्यामुळे श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शासाठी चोवीस तास नळदुर्ग मार्गे भाविक प्रवाशांचे वाहन ये-जा करतात. त्या्चबरोबर तामिळनाडू, आंध्रप्रदेश, कर्नाटक राज्यावतून नळदुर्ग मार्गे तुळजापूर, बीड, औरंगाबाद आणि तेथून पुढे मध्यप्रदेश, हरियाणा, गुजरात, राजस्थान, पंजाब यासह देशातील विविध प्रांतात माल वाहतूक करणारे शासकीय, निमशासकीय ट्रकांची एकसारखी रिघ असते. नळदुर्गहून तुळजापूरकडे जाणा-या रस्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने वाहनचालकांना मार्गदर्शन व्हावे, याकरिता दिशा दर्शक फलक लावलेच नाही. त्यामुळे केवळ रस्याची माहिती मिळत नसल्याने अनेक वाहनचालकांची पंचाईत होताना दिसत आहे. रस्‍त्‍याच्‍या कडेला लावलेलल्या दिशा दर्शक फलकावर कशाचाही उल्लेख नाही. हा फलक गेल्या अनेक वर्षापासून उभा असून सार्वजनिक बांधकाम विभागाला या फलकाचा विसर तर पडला नाही, अशी प्रतिक्रिया वाहनचालकांतून होत आहे. तात्काळ संबंधितांची चौकशी करुन दोषीवर कडक कारवाई करावी व या फलकावर दिशा दर्शकाची माहिती देण्याची मागणी प्रवाशी,वाहनचालकांतून होत आहे.

उस्‍मानाबाद जिल्‍हयात बीएसएनएल सीमकार्डचा तुटवडा

उस्मानाबाद जिल्ह्यातील भारत संचार निगङ्क लिमिटेडच्या (बीएसएनएल)उदासीन धोरणामुळे महाकृषी संचार योजनेंतर्गत सीमकार्डचा तुटवडा गेल्या दोन महिन्यापूर्वीसून झाले असून शेतकर्‍यांना सीमकार्डसाठी कार्यालयात वारंवार चकरा माराव्या लागत असल्याने बीएसएनएलच्या मनमानी कारभाराबद्दल शेतकर्‍यात संताप व्यक्त केला जात आहे. आजवर शेतकर्‍यांच्या हिताच्या योजना कमी प्रमणात राबविल्याने उन्नती साधत नव्हती. मात्र महाकृषी संचार योजनेने शेतकरीवर्ग हायटेक होत असून शेतकर्‍यांना या योजनेमुळे कृषी विभागाच्या अधिकार्‍यांशी थेट व मोफत संपर्क साधता येत असल्याने दिवसेंदिवस सीमकार्डच्या मागणीत वाढ होताना दिसत आहे. बीएसएनएलने खास शेतकर्‍यांसाठी ही योजना राबवित आहे.शेतकर्‍यांसाठी असलेल्या या योजनेंतर्गत सातबारा व कृषी विभागाच्या पत्रावर मोफत सिमकार्ड मिळत आहे. नेहमीच्या वापरातील बीएसएनएलचा नंबर शेतकर्‍यांकडे असल्यास तोच नंबर अर्ज देऊन या योजनेत कन्व्हर्टकरता येण्याची सुविधाही आहे. शेतकर्‍यांना कृषी कर्मचार्‍यांशी सतत संपर्क करावा लागतो. कृषी खात्यामार्फतही जैविक कीड नियंत्रणासारख्या कार्यक्रमांतर्गत पिकांवर कीड आणि उपाययोजनांसाठी एसएमएसद्वारे माहिती गावागावांतील निवडक शेतकर्‍यांना दिली जाते. हे शेतकरी आपापल्या गावातील अन्य शेतकर्‍यांना एसएमएस अथवा प्रत्यक्ष संभाषणाद्वारे ही माहिती पुढे पोचवतात. हे काम या महाकृषी संचार योजनेच्या सीयूजी (क्लोज युजर ग्रुप) माध्यमातून सोपे झाले आहे. मध्यंतराच्या काळात बीएसएनएलने या योजनेतील कार्डची विक्री बंद केली होती. या योजनेचा लाभ शेतकर्‍यांना होऊ लागल्याने सिमकार्डची मागणीत वाढ होऊ लागली होती. त्यामुळे बीएसएनएलने देखील खासगी कंपन्यांना टक्कर देण्यासाठी पुन्हा योजना कार्यान्वित केली. शेतकर्‍यांना न्यू महाकृषी योजनेचा सिमकार्ड वितरित केले जात आहे. ही योजना पोस्टपेड आणि प्रीपेड या दोन्ही प्रकारात आहे. या योजनेतील सिमकार्ड घेण्यासाठी शेतकर्‍यांनी तालुका कृषी कार्यालयातून शेतकरी असल्याचा दाखला कागदपत्रांसमवेत जोडून शेतकरी बीएसएनएल कार्यालयात चकरा मारीत आहेत. न्यू महाकृषी संचार पोस्टपेडसाठी मासिक भाडे केवळ ९८ रुपये, तर प्रीपेडसाठी १०८ रुपये असून, सीयूजी अंतर्गत केले जाणारे सर्व कॉल मोफत असतील, अन्य कोणत्याही नेटवर्कसाठी २०० मिनिटे व बीएसएनएलसाठी ३०० मिनिटे मोफत बोलता येईल. महिनाभरात ४०० एसएमएस मोफत करता येतील. जीपीआरएसअंतर्गत २०० एमबी डाऊनलोड मोफत राहील. या योजनेच्या सुविधेनंतर कोणत्याही मोबाईलशी फक्‍त ४० पैशांत, बीएसएनएलच्या नेटववर्कमध्ये ३० पैशांत आणि मोबाईलवरून लॅण्डलाइनशी ३० पैसे प्रती मिनीट कॉल दर राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान बीएसएनएलच्या वरिष्ठ अधिकार्‍यानी तात्काळ उस्मानाबाद जिल्ह्यासाठी सीमकार्ड उपलब्ध करुन देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.